संस्थेची वाटचाल

संस्थेची वाटचाल

  • ०७/१०/२०१८ –   श्री क्षेत्र पर्वत येथे भक्त निवास व्हावे हि संकल्पना मांडण्यासाठी सातगाव भोसलेप्रतिनिधींची सातारा जिल्ह्यातील शिंदी, उचाट आणि वाघावळे येथील ग्रामस्थांबरोबर संयुक्त बैठक.
  • ०३/११/२०१९ –   सातगाव भोसले प्रतिष्ठानसंस्थेची वेबसाईट satgaonbhosle.in प्रसारित करण्यात आली.
  • १४-१५/१२/२०१९ – सातगाव परिसरात गावोगावी जाऊन संस्थेच्या कॅलेंडरचे वाटप करण्यात आले तसेच संस्था स्थापने विषयी माहिती देण्यात आली.
  • ०२/०२/२०२० – संस्थेच्या प्रचार व प्रसारासाठी सातगाव भोसलेकार्यकारिणी समिती सदस्यांनी पुणे येथे भेट दिली.
  • ३१.०३.२०२० – ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या ६ महिन्यात ३५५ आजीव सभासदांची नोंदणी करण्यात आली.
  • ०६.०३.२०२० – कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेस या गाड्यांना खेड स्थानकावर कायम स्वरूपी थांबा देणे बाबतची मागणीकरणारे पत्र कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूरखेड रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांना देण्यात आले.
  • २८.०४.२०२० – कोकणवासीय चाकरमान्यांना आरोग्य तपासणी करून कोकणात त्यांच्या गावी पाठविण्याबाबतचे निवेदन मा. मुख्यमंत्र्यांना तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना देण्यात आले.
  • १२.०५.२०२० – संस्थेच्या अधिकृत सदस्यांचे ३ व्हाट्सअँप ग्रुप व प्रचारासाठी २ व्हाट्सअँप ग्रुप बनविण्यात आले व त्याद्वारे ४०० सदस्यांसह समाजातील साधारण ७०० व्यक्तींना एकत्र जोडण्यात आले.
  • २०.०५.२०२० – सातगाव भोसले प्रतिष्ठान संस्था स्थापना माहितीपटबनविण्यात आला आणि तो संस्थेच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर प्रसारित केला.
  • २३.०५.२०२० – कोरोना काळात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संस्थेतर्फे ‘अर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांच्या १५० बाटल्या मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातील गरजूंना मोफत वाटप करण्यात आल्या.
  • २६.०५.२०२० आजीव सभासदत्वासाठी ऑनलाईन अर्ज भरणेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आली. या माध्यमाचा उपयोग करून सातगाव, मुंबई, पुणे, गुजरात अश्या विविध ठिकाणांहून आजमितीस जवळपास १०० जणांनी संस्थेच्या सभासदत्वासाठी अर्ज केला आहे. संस्थेची ५०० सभासद संख्या गाठण्याकडे जोरदार वाटचाल सुरु आहे. या नवीन सभासदांमध्ये विविध क्षेत्रातील अनेकजण उच्चशिक्षित आणि तरुण सातगावकर भोसले आहेत.
  • १०/०६/२०२० – सातगाव भोसले प्रतिष्ठानया संस्थेचे अध्यक्ष श्री. धनंजय दिनकरराव भोसले यांच्यातर्फे ‘अर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांच्या साधारण ३००० बाटल्या “सातगाव” तसेच “खेड” परिसरात मोफत वाटण्यात आल्या. यावेळी संस्थेचे खजिनदार श्री. कृष्णकांत चंद्रकांत भोसले हजर होते.