ध्येय उद्दिष्टे

सातगाव भोसले प्रतिष्ठान"ची ध्येयउद्दिष्टे

 • समाजाच्या एकत्रीकरण व हिता करिता कार्य करणे.
 • समाजाचा ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक वृत्तांत तयार करणे.
 • परिवाराची वंशावळ माहिती संकलन करणे.
 • परिवाराशी संबंधित ऐतिहासिक स्थाने आणि अवशेषांचे जतन आणि जीर्णोद्धार करणे.
 • परिवाराची निर्देशिका बनवून व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क, परिचय घडविणे.
 • माहितीच्या देवाणघेवाणीसाठी वेबसाईट / मोबाईल अँप्लिकेशन बनविणे.
 • स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिवार मेळावे भरविणे.
 • विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणे.
 • शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात विशेष प्राविण्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करणे.
 • गरीब गरजू होतकरु विद्यार्थ्यांना सहाय्य करणे.
 • युवापिढी, महिला व जेष्ठ नागरिकांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, आरोग्यया व अश्या सर्वांगीण यश व उत्कर्षासाठी योजनावद्ध कार्यक्रम राबविणे.
 • माहितीपूर्ण, मार्गदर्शक व आदर्श कुलवृत्तांत प्रसिद्ध करणे.
 • वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण याबाबत जनजागृती करणे.
 • कृषीपर्यटन योजना, सामुहिक शेती, शेतमाल प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे.
 • पशुसंवर्धन, शेळीपालन, दूध उत्पादन, कुक्कुटपालन व शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणे.
 • उद्योग क्षेत्र व रोजगार निर्मितीच्यादृष्टीने कौशल्य विकास व उदयोजकताबाबत मार्गदर्शन करणे.
 • व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन, नोकरीच्या संधी आणि रोजगार याबाबत मार्गदर्शन करणे.
 • नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करणे.
 • सार्वजनिक वाचनालय सुरु करणे, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी सुरु करणे.
 • रक्तदान, नेत्रदान, देहदान आणि अवयवदान याबाबत जनजागृती करणे.
 • सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या सातगावच्या विविध संस्थांना समान ध्येयउद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करणे.